पाकिस्तानच्या १६ यूट्यूब चॅनेलवर बंदी   

नवी दिल्ली : भारतात आता पाकिस्तानातील १६ यूट्यूब चॅनेल दिसणार नाहीत. भारताने या चॅनेलवर बंदी आणली आहे. भारत, भारतीय लष्कर आणि सुरक्षा यंत्रणांविरोधात प्रक्षोभक माहिती पसरविल्याच्या आरोपावरुन ही कारवाई करण्यात आली.
 
बंदी घातलेल्या चॅनेलमध्ये डॉन न्यूज, ईशाद भाटी, समा टीव्ही, एआरवाय न्यूज, बोल न्यूज, रफ्तार, द पाकिस्तान रेफरन्स, जिओ न्यूज, समा स्पोर्ट्स, जीएनएन, उजैर क्रिकेट, उमर चीमा एक्सक्लुझिव्ह, अस्मा शिराझी, मुनीब फारूक, सुनो न्यूज आणि राझी नामा यांचा समावेश आहे. गृह मंत्रालयाच्या शिफारशीवरून ही कारवाई करण्यात आली आहे. वाहिन्या चुकीची आणि खोटी माहिती, जातीय तणाव निर्माण करण्यासाठी तयार केलेली मजकूर पसरवत असल्याचे आढळून आले आल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
 
जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी दहशतवादी हल्ला झाला होता. यामध्ये २६ जणांचा मृत्यू झाला होता. यामध्ये एक परदेशी आणि दोन स्थानिकांचा समावेश होता. तर, अन्य पर्यटक होते.या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात आक्रमक पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. सिंदू नदी जल वाटप करार स्थगित करण्यापासून पाकिस्तानी नागरिकांना भारतातून हुसकावून लावण्याचा यात समावेश आहे.
 

 

Related Articles